जरांगे निवडणूक लढवणार ?

जरांगे निवडणूक लढवणार ?

मुंबई, १९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मुंबईत येऊन बेमुदत उपोषण करणार आहेत. या उपोषणासाठी जरांगे आंतरवाली सराटी येथून समर्थकांसह पदयात्रा करत मुंबईत येणार आहेत. जरांगेंचे मुंबईत प्रजासत्ताक दिनी येण्याचे नियोजन आहे. सध्या जरांगे आणि राज्य शासनाचे प्रतिनिधी यांच्यात दररोज चर्चा सुरू आहे. या चर्चेतून मार्ग निघाला तर जरांगेंचे आंदोलन रद्द होण्याची शक्यता आहे. यामुळे जरांगे मुंबई की नाही येणार यावरून चर्चेला उधाण आले आहे. ही चर्चा सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना लोकसभेची निवडणूक लढवण्याचे आवाहन केले आहे. लोकसभा निवडणुकीत जिंकून मराठा आरक्षणासाठी प्रभावी पद्धतीने लढा देता येईल, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. गरीब मराठ्यांचा लढा पस्तीस वर्षांपासून सुरू आहे. या लढ्याला श्रीमंत मराठ्यांनी कधीही महत्त्व दिलेले नाही. पण आता जरांगेंच्या नेतृत्वात मराठा समाजाच्या आंदोलनाला ठोस दिशा मिळाली आहे. सहानुभूती निर्माण झाली आहे. गरीब मराठ्यांच्या आरक्षणासाठी स्वतंत्र ताट निर्माण करण्याची गरज आहे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version