व्हायरल व्हिडीओवरून अजित पवार संतापले

व्हायरल व्हिडीओवरून अजित पवार संतापले

मुंबई, १८ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, मंत्री गिरीश महाजन आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोटारीत दाटीवाटीने बसलेला असतानाचा व्हिडीओ समाज माध्यमांत व्हायरल झाला. या व्हिडीओवर विरोधकांकडून टीका झाली. याच व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले. व्हिडीओ व्हायरल करणारा मूर्ख आहे, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.

व्हायरल व्हिडीओ

‘पंतप्रधानांच्या दौऱ्यामध्ये कोण कुणाच्या गाडीत बसणार, कुठे बसणार हे चेक होत असतं. पुढे गाडीचा चालक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर मागे मी, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे बसणार होतो. पण ताफा एकदम पुढे गेल्याने आमचे मंत्रिमंडळातील सहकारी गिरीश महाजन यांना बसायला गाडी नसल्याचे लक्षात आले. मीच त्यांना म्हटलं आपण दाटीवाटीने जाऊ. शेवटी आम्ही काही रुबाब दाखवणारी माणसं नाही. एकमेकांना सांभाळून, एकमेकांना सोबत घेऊन जाणारी माणसं आहोत’, असे अजित पवार म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version