महायुतीच्या मेळाव्यांचा महाएल्गार

महायुतीच्या मेळाव्यांचा महाएल्गार

मुंबई, १३ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : महायुती रविवारी संध्याकाळी निवडणुकांचं रणशिंग फुंकणार आहे. शिंदे सरकारचे दोन मंत्री याप्रसंगी उपस्थित असतील. भाजपाचे मंगलप्रभात लोढा आणि शिवसेनेचे दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत रविवारी संध्याकाळी सहा वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून महायुती निवडणुकांचं रणशिंग फुंकणार आहे. यानंतर संध्याकाळी सात वाजता मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, खासदार गजानन कीर्तिकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांचे नेते रंगशारदा सभागृहात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

महायुतीच्या मेळाव्यांचा महाएल्गार
मुंबईतून मेळाव्यांना सुरुवात
महायुती फुंकणार निवडणुकांचं रणशिंग

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version