उदय सामंत आणि उद्धव गटाच्या खासदाराची भेट

उदय सामंत आणि उद्धव गटाच्या खासदाराची भेट

रत्नागिरी, १३ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि उद्धव गटाचे खासदार विनायक राऊत यांची भेट झाली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना उदय सामंत यांनी ‘आम्ही विकासकामांसाठी एकत्र असतो’ असे वक्तव्य केले. यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. महसूल कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने उद्योगमंत्री उदय सामंत आणि उद्धव गटाचे खासदार विनायक राऊत यांची भेट झाली. यावेळी कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट झाल्याचे राऊत म्हणाले. यावेळी विकास कामासाठीही भविष्यात एकत्र येणार का ? असे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले. यावेळी बोलताना उदय सामंत यांनी ‘आम्ही विकासकामांसाठी एकत्र असतो’ असे सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version