मिलिंद देवरा शिवसेनेच्या वाटेवर ?

मिलिंद देवरा शिवसेनेच्या वाटेवर ?

मुंबई, १३ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत वाद सुरू असल्यामुळे मिलिंद देवरा शिवसेनेच्या वाटेवर असल्याची कुजबूज सुरू आहे. उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमुळे तर या चर्चेने आणखी जोर धरला आहे. एकनाथ शिंदे यांना मिलिंद देवरांची साथ मिळाली तर मुंबईत शिवसेना आणखी वेगाने वाढण्यास मदत होईल, असे उदय सामंत म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारण्याची आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याची तयारी असेल तर मिलिंद देवरांचे शिवसेनेत स्वागत आहे, असेही उदय सामंत म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version