भारतानं पहिली टी २० जिंकली

भारतानं पहिली टी २० जिंकली

मोहाली, १२ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी २० मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला. भारताने मोहालीतील टी २० सामना सहा गडी राखून जिंकला. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानने वीस षटकांत पाच बाद १५८ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने १७.३ षटकांत चार बाद १५९ धावा केल्या. भारताकडून शिवम दुबेने सर्वाधिक धावा केल्या. त्याने चाळीस चेंडूत नाबाद साठ धावा केल्या. त्याच्या अर्धशतकी खेळीत दोन षटकार आणि पाच चौकारांचा समावेश होता.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version