उद्धव यांच्यावर काढलेले व्यंगचित्र व्हायरल

उद्धव यांच्यावर काढलेले व्यंगचित्र व्हायरल

मुंबई, १२ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात निवडणूक आयोगानंतर आता विधानसभाध्यक्षांचा निकालही उद्धव गटाच्या विरोधात गेला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आहे तीच खरी शिवसेना, असा निकाल आला आहे. दोन घटनात्मक पदांवरून उद्धव गटाच्या विरोधात निकाल आला आहे. लोकसभेची निवडणूक जवळ आली असताना आलेल्या या निकालामुळे उद्धव गटाची राजकीय कोंडी झाल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. या चर्चेचा संदर्भ घेऊन एका व्यंगचित्रकाराने काढलेले व्यंगचित्र समाज माध्यमात व्हायरल होऊ लागले आहे. मनसेच्या शालिनी ठाकरे यांनी हे व्यंगचित्र एक्स अर्थात ट्विटरवरून ट्वीट केले आहे.

‘केवढी प्रचंड कल्पनाशक्ती असते व्यंग चित्रकारांची…. इथे “व” ला कळून चुकलय… “ध” अर्धवट आहे… अगतिक आहे… लाचार आहे… बेबस है….. आपला आधार नसेल तर तो संपल्यातच जमा आहे… पण त्याला तरी या “ध” ला कुठे टिकवायचा आहे… म्हणून त्याने हात दिलेला नाहीये… पोटाला लटकणारा हा “ध” पुरता लटकलाय याची “व”ला कल्पना आहे… पण “ध” ला लटकवताना “व” देखील लटकला…. कारण कर्म… “ध्व” एवढा कधीच समजला नव्हता… आज हे समजावून सांगणाऱ्या व्यंगचित्रकाराला सलाम! शाबास!!’ या शब्दात मनसेच्या शालिनी ठाकरे यांनी व्यंगचित्रकाराचे कौतुक केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version