आमदार अपात्रतेवर कोणत्या पक्षाचे नेते काय म्हणाले ?

आमदार अपात्रतेवर कोणत्या पक्षाचे नेते काय म्हणाले ?

मुंबई, १० जानेवारी २०२४, प्रतिनिधी : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी बुधवारी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिला. हा निकाल आल्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. विधानसभाध्यक्षांनी दिलेला निकाल हा राजकीय असल्याची प्रतिक्रिया खासदार शरद पवार यांनी दिली. निकालाची माहिती तो जाहीर होण्याआधीच सत्ताधाऱ्यांना होती, असेही पवार म्हणाले. तर नार्वेकरांकडून लोकशाहीची हत्या झाली असून आमची घटना अवैध, मग आमदार पात्र कसे झाले असा सवाल उद्धव यांनी केला आहे. शिवसेना कधीच संपणार नाही ,शिंदेंची शिवसेना होऊच शकत नाही, त्यामुळे या निकालाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असून हा निकाल अंतिम नाही असंही उद्धव यांनी सांगितले. पवार आणि उद्धव यांच्या पाठोपाठ विधानसभाध्यक्षांवर खासदार संजय राऊत यांनीही टीका केली. सर्वकाही आधीपासूनच फिक्स झालं होत, त्यामुळे आजच्या निकालाची केवळ औपचारिकता होती, असं राऊत यांनी म्हटलं आहे. गुजरात लॉबीकडून बाळासाहेबांची शिवसेना संपण्याचा कट असल्याचेही राऊत म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version