उद्धव गटाचे दोन शिलेदार अडचणीत

उद्धव गटाचे दोन शिलेदार अडचणीत

मुंबई, ९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल बुधवारी येण्याची शक्यता आहे. हा निकाल जाहीर होण्याच्या आदल्या दिवशी उद्धव गटाचे दोन शिलेदार अडचणीत सापडले आहेत. खासदार राजन विचारे यांच्या मालमत्तांवर आयकर विभागाची धाड पडली आहे. तसेच उद्धव यांचे विश्वासू रवींद्र वायकर यांच्या मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने धाड टाकली आहे. जोगेश्वरी येथील भूखंड व्यवहार प्रकरणी वायकर यांच्या मालमत्तांवर धाड टाकण्यात आल्याचे समजते. याआधी राज्यसभा खासदार संजय राऊत आणि विधान परिषदेतील आमदार अनिल परब यांच्या मालमत्तांवरही ईडीची धाड पडली होती. संजय राऊत यांना तर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तीन महिने तुरुंगात काढावे लागले.

काय म्हणाले किरीट सोमैया ?

‘उद्धव ठाकरे असो किंवा त्यांचे पार्टनर रवींद्र वायकर, संजय राऊत, अनिल परब या सर्वांनी कोविडमध्ये फक्त कमाई करण्याचं पाप केलं. जुलै २०२१ मध्ये उद्धव ठाकरेंनी रवींद्र वायकर यांना बेकायदा पद्धतीने जोगेश्वरी येथे अनधिकृत फाईव्ह स्टार हॉटेल बांधण्याची परवानगी दिली. हा घोटाळा उघडकीस आल्यावर उद्धव ठाकरेंनी हे प्रकरण दाबलं. पण हे सगळं आता बाहेर आलेलं आहे. रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरेंचे पार्टनर आहेत. अलिबाग येथील १९ बंगल्यांचा घोटाळादेखील वायकर आणि ठाकरेंनी एकत्र केला आहे. रवींद्र वायकर यांनी नोटबंदीमध्येही हात धुऊन घेतला होता. त्यामुळे हिसाब तो देना पडेगा’

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version