‘…तर आव्हाडांचा वध करू’, जगतगुरू परमहंस आचार्य कडाडले

‘…तर आव्हाडांचा वध करू’, जगतगुरू परमहंस आचार्य कडाडले

अयोध्या, ५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : राम मांसाहारी होता तो वनवासात असताना मांसाहार करत होता, असे सुप्रिया गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले. आव्हाडांच्या या वक्तव्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अयोध्येतील तपस्वी छावणीचे पीठाधीश्वर जगतगुरू परमहंस आचार्य यांनी तर
आव्हाडांवर कडाडून टीका केली. आव्हाडांवर तातडीने कारवाई करा, नाही तर त्यांचा वध करू; असे जगतगुरू परमहंस आचार्य म्हणाले.

रामाच्या भक्तांच्या भावनांना धक्का बसेल, असे वक्तव्य करणाऱ्या आव्हाडांचा जगतगुरू परमहंस आचार्य यांनी जाहीर निषेध केला. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी आणि कायद्यानुसार आव्हाड यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी जगतगुरू परमहंस आचार्य यांनी केली. आव्हाडांवर तातडीने कारवाई करा, नाही तर त्यांचा वध करू; असेही ते संतापून म्हणाले.

दुसऱ्या धर्माशी संबंधित विषयावर कोणी भावना दुखावणारे वक्तव्य केले तर कदाचित ती व्यक्तीच जीवंत राहणार नाही. मग प्रभू राम यांच्याविषयी त्यांच्या भक्तांच्या भावना दुखावणारे वक्तव्य करणाऱ्यावर कारवाई ही झालीच पाहिजे, असे जगतगुरू परमहंस आचार्य म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version