नवी दिल्ली, १ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : कॅनडामध्ये लपून बसलेल्या गुंड गोल्डी ब्रार याला भारत सरकारने दहशतवादी घोषित केले. गोल्डीला यूएपीए अंतर्गत दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. याआधी कॅनडामध्ये लपून बसलेल्या गुंड लखबीर सिंह लंडा याला भारत सरकारने दहशतवादी घोषित केले. गोल्डी ब्रार हा लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित आहे. त्याने प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्येची जबाबदारी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करून घेतली होती. गोल्डी हा बब्बर खालसा इंटरनॅशनल या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेशीही संबंधित आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.