राहुल गांधी दुबईत

राहुल गांधी दुबईत

नवी दिल्ली, १ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : काँग्रेस खासदार राहुल गांधी खासगी कामासाठी दुबईच्या दौऱ्यावर आहेत. दिल्ली – दुबई विमानाने राहुल गांधी दुबईत दाखल झाले आहेत. ते १ जानेवारी रोजी मायदेशी परतण्याची शक्यता आहे. त्यांच्या दुबई दौऱ्याबाबत काँग्रेसकडून सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही.

राहुल गांधी १४ जानेवारीपासून भारत न्याय यात्रा सुरू करणार आहेत. या यात्रेची सुरुवात मणिपूरमधील इंफाळ शहरातून होईल. यात्रेचा सामारोप २० मार्च रोजी मुंबईत होणार आहे. ही ६२०० किमी. ची यात्रा मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र या राज्यांमधून जाणार आहे. भारत न्याय यात्रा ही भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा आहे. ही १५० दिवसांची पदयात्रा आहे. आधी या यात्रेची सुरुवात अरुणाचल प्रदेशमधून होणार होती. पण काँग्रेसने घोषणा करताना यात्रेच्या मार्गातून अरुणाचल प्रदेश हे राज्य वगळले. या निर्णयाचे कारण काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेले नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version