संजोग वाघेरे उद्धव गटात

संजोग वाघेरे उद्धव गटात

मुंबई, ३० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर संजोग वाघेरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह उद्धव गटात प्रवेश केला. उद्धव गटाने मावळ लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी म्हणून वाघेरेंचे स्वागत केले. मावळ आणि पिंपरी चिंचवडमध्ये पक्षासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करेन, असा विश्वास संजोग वाघेरे यांनी व्यक्त केला. तर जिथे सत्ता असते तिकडे गर्दीचा ओघ असतो; पण इकडे सत्ता नसताना ती आणण्याच्या जिद्दीने आले आहात असे म्हणत उद्धव यांनी संजोग वाघेरे यांचे स्वागत केले. मावळला प्रचाराला येण्याची गरज नाही, हे तुमच्या उत्साहावरुन दिसतंय. पण, मी प्रचाराला नक्की येणार आहे, असे उद्धव म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version