कॅलिफोर्निया, २३ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतातील नेवार्कमध्ये खलिस्तान समर्थकांनी मंदिराची तोडफोड केली. हल्लेखोरांनी मंदिराच्या भिंतींवर भारतविरोधी घोषणा लिहिल्या. तसेच मंदिराच्या फलकावर भारतविरोधी चित्र काढले. कॅलिफोर्निया पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून तपास सुरू केला आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिकेतील भारताच्या वाणिज्य दूतावासाने याप्रकरणी अमेरिका सरकारकडे तक्रार केली आहे. ज्या मंदिरावर हल्ला झाला ते मंदिर राजधानी वॉशिंग्टन डीसीपासून १०० किमी. अंतरावर आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.