समुद्रात ड्रोन हल्ला, भारतीय नौदलाला ‘हाय अलर्ट’

समुद्रात ड्रोन हल्ला, भारतीय नौदलाला ‘हाय अलर्ट’

वेरावळ, २३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : सौदी अरेबियातून भारतातील मंगळुरू बंदरावर तेल घेऊन येत असलेल्या एका मालवाहक जहाजावर ड्रोन हल्ला झाला. या जहाजावर २० भारतीय कर्मचारी आहेत. अरबी समुद्रात एक ड्रोन जहाजावर आदळले. यामुळे झालेल्या स्फोटानंतर जहाजाच्या एका भागात आग लागली होती. ही आग जहाजावरील कर्मचाऱ्यांनी नियंत्रणात आणली. यामुळे मोठे संकट टळले. ड्रोन हल्ल्यानंतर अरबी समुद्रात भारतीय नौदलाला ‘हाय अलर्ट’ अर्थात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

ड्रोन हल्ला गुजरातमधील पोरबंदर बंदरापासून २१७ सागरी मैल अंतरावर अरबी समुद्रात झाला होता. याच कारणामुळे अरबी समुद्रात भारतीय नौदलाला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. ड्रोन हल्ल्यामुळे जहाजावर जीवितहानी झालेली नाही. जहाज आणि त्यावरील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत. नौदल आणि मालवाहक जहाज एकमेकांच्या संपर्कात आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version