कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवले

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवले

बंगळुरू, २३ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भाजपाने कर्नाटकमध्ये शिक्षण संस्थांमध्ये लागू केलेली हिजाब बंदी हटवणार असे कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरमैया म्हणाले. या घोषणेवर भाजपाने टीका केली. आता कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवले. हिजाब बंदी हटवण्याचा निर्णय घेतलेला नाही, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैया म्हणाले,

काँग्रेस समाजात फूट पाडत असल्याचा आरोप भाजपाने केला. न्यायालयाने शिक्षण संस्थेत गणवेष वापरावा हिजाब वापरू नये अशा स्वरुपाचा निर्णय दिला होता. या निर्णयाचे उल्लंघन करत कर्नाटकचे काँग्रेस सरकार न्यायालयाचा अवमान करत आहे, अशीही टीका सुरू झाली. काँग्रेसची सत्ता आल्यानंतर निवडक परीक्षा केंद्रांमध्ये हिंदू महिलांना मंगळसूत्र, जोडवी काढून परीक्षेला या असे सांगितले जाते दुसरीकडे हिजाब घालण्यास परवानगी दिली जाते… हा भेद करून काँग्रेस फूट पाडण्याचे उद्योग करत आहे, असाही आरोप भाजपाने केला. काँग्रेस मुसलमानांची प्रगती व्हावी यासाठी प्रयत्न करत नाही पण त्यांच्यातील धर्मांधतेला खतपाणी घालणारे निर्णय राबवते किंवा त्यासाठी प्रयत्न करते, अशी टीका जोर धरू लागली. हे सगळे प्रकरण भोवणार याचा अंदाज येताच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवले. हिजाब बंदी हटवण्याचा निर्णय घेतलेला नाही, असे ते म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version