कसोटी सामन्यापूर्वी कोहली मायदेशी परतला

कसोटी सामन्यापूर्वी कोहली मायदेशी परतला

मुंबई, २२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका मंगळवार २६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना सेंचुरियन येथे खेळवला जाणार आहे. या सामन्याआधीच भारताचा प्रमुख फलंदाज विराट कोहली मायदेशी परतला आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कोहलीची फक्त कसोटी मालिकेकरिता निवड झाली आहे. यामुळे कसोटी मालिकेआधीच कोहली मायदेशी परतल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

ऋतुराज गायकवाडला बोटाच्या दुखापतीमुळे कसोटी मालिका सोडून मायदेशी परतावे लागले आहे. आता कोहली पण मायदेशी परतला आहे. पण कोहलीच्या परतण्याचे कारण हे कौटुंबिक आहे. याबाबत सविस्तर माहिती मिळालेली नाही. पण कसोटी मालिका सुरू होण्याआधी विराट कोहली दक्षिण आफ्रिकेला परतणार असल्याचे समजते. कोहलीला कौटुंबिक कारणामुळे सराव सत्रात सहभागी न होण्याची परवानगी मिळाली. ही परवानगी मिळाल्यानंतर कोहली मायदेशी परतला आहे. तो २२ डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्याची शक्यता आहे. तो शनिवार २३ डिसेंबर पर्यंत दक्षिण आफ्रिकेत पोहोचेल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version