मुंबई, २२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : मनोज जरांगे यांच्या डोक्यात दररोज येणाऱ्या नवनव्या अभिनव कल्पनांचा आपण आदर राखला पाहिजे. त्यांच्या सर्व मागण्या या लॉजिकल आणि कायद्याला धरुन येत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्याशी वाटाघाटी न करत बसता थेट मराठा आरक्षणाचा जीआर काढला पाहिजे. एवढेच नव्हे तर मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी जालन्याला जाण्याऐवजी अंतरवाली सराटी येथेच दोन-चार मंत्र्यांचे कायमस्वरुपी बंगले आणि मुख्य सचिवांचे एक कार्यालयही सुरु करावे. जेणेकरुन मनोज जरांगे यांच्या डोक्यातून एखादी अभिनव कल्पना निघाली की, मुख्य सचिव लगेच सही करुन तसा जीआर काढू शकतील, असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले. ते शुक्रवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. ‘जरांगेंनी सरकारला नव्हे तर सरकारनेच जरांगेंना वेठीस धरलंय’, ‘आता पुढच्या मेळाव्यात मीदेखील जरांगेंच्याच बाजूने भाषण करणार आहे’, असे उपरोधिक शैलीत मंत्री छगन भुजबळ म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.