राऊतांचे निकटवर्तीय अडचणीत, मालमत्ता जप्त

राऊतांचे निकटवर्तीय अडचणीत, मालमत्ता जप्त

मुंबई, २२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने उद्धव गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळकल्या जाणाऱ्या सुजित पाटकर यांच्या नावावर असलेल्या म्युच्युअल फंड युनिट्स आणि बँक खात्यांसह मुंबईतील १२.२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. जप्तीत मुंबईतील तीन सदनिकांचाही समावेश आहे. सुजित पाटकर कोविड फिल्ड हॉस्पिटल घोटाळ्यातील आरोपी आहे. या कारवाईचे भाजपाच्या किरीट सोमय्या यांनी स्वागत केले.

लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीने बनावट कागदपत्रे सादर करुन कोविड फिल्ड हॉस्पिटलचे कंत्राट मिळवले, असा आरोप ईडीने आरोपपत्राद्वारे केला आहे. सुजित पाटकर , डॉ. हेमंत गुप्ता, संजय शहा आणि आणखी एक सहआरोपी राजीव साळुंखे यांनी २०२० मध्ये लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीची स्थापना केली होती. कंत्राट मिळवण्यासाठी संजय राऊत यांच्या नावाचा वापर केला गेला असल्याचा आरोपही ईडीने केला आहे. लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीला मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या ३२ कोटी रुपयांपैकी फक्त आठ कोटी रुपये खर्च करण्यात आले, असाही आरोप ईडीने केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version