मराठवाड्यात शंभर टक्के दुष्काळ

मराठवाड्यात शंभर टक्के दुष्काळ

छत्रपती संभाजीनगर, २१ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: मराठवाड्यातील विभागातील आठही जिल्ह्यांतील अंतिम पैसेवारी ५० पैश्यांच्या आत असल्याचे समोर आले आहे. मराठवाड्यातील 8 हजार ४९६ गावात एकूण ४७.४२ एवढी सरासरी आणेवारी असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. मराठवाड्यातील खरीप हंगाम २०२३-२४ ची सुधारित आणेवारी घोषीत करण्यात आली असून, त्यातून ही आकडेवारी समोर आली आहे.

त्यामुळे, मराठवाड्यात शंभर टक्के दुष्काळ असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक १ हजार ६५२ गावांचा अंतिम पैसेवारी ५० पैश्यांच्या आत आहे. मराठवाड्यात यंदा अपेक्षित पाऊस झाला नसल्याने विभागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील खरीप हंगाम २०२३-२४ ची सुधारित आणेवारी घोषीत करण्यात आली असून, ज्यात विभागातील आठही जिल्ह्यांतील अंतिम पैसेवारी ५० पैश्यांच्या आत असल्याचे समोर आले आहे.

विभागातील एकूण ५६ लाख १५ हजार १०.६५ हेक्टर पेरणी योग्य क्षेत्र आहे. मात्र, लांबलेल्या पावसामुळे त्यापैकी ५० लाख ९७ हजार ६०६.६२ हेक्टरवर पेरणी झाली. तर ४ लाख ७९ हजार ८६६.६१ क्षेत्र पडीक राहिले आहे. जुलै महिन्यात काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version