नवी दिल्ली, २० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : निलंबित खासदारांना संसदेच्या इमारतीत प्रवेशबंदी लागू आहे. ही बंदी निलंबन असेपर्यंत कायम राहणार आहे. यंदाच्या हिवाळी अधिवेशनात आतापर्यंत लोकसभेतून ९५ आणि राज्यसभेतून ४६ खासदारांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले आहे. या १४१ खासदारांना संसदेच्या इमारतीत प्रवेश बंद करण्यात आला आहे.
केंद्र सरकारची भूमिका : घुसखोरांच्या कृतीचा निषेध आणि त्यांच्या विरोधात केलेल्या अटकेच्या कारवाईची माहिती संसदेच्या दोन्ही सभागृहांना दिली आहे. घुसखोरी प्रकरणी अटक केलेल्यांची चौकशी सुरू आहे. ही चौकशी पूर्ण होण्याआधी याबाबतचे निवेदन देणे योग्य होणार नाही.
विरोधकांची मागणी : संसदेतील घुसखोरी प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत आणि राज्यसभेत निवेदन द्यावे. घुसखोरीच्या मुद्यावर दोन्ही सभागृहात सविस्तर चर्चा करावी.
कारवाईचे कारण : मागणी करताना संसदीय शिस्तीचे उल्लंघन करणे
कारवाई : हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन
शुक्रवार १५ डिसेंबर २०२३ : लोकसभेतून १३ खासदारांचे निलंबन
शुक्रवार १५ डिसेंबर २०२३ : राज्यसभेतून तृणमूलच्या डेरेक ओ’ब्रायन यांचे निलंबन
सोमवार १८ डिसेंबर २०२३ : लोकसभेतून ३३ खासदारांचे निलंबन
सोमवार १८ डिसेंबर २०२३ : राज्यसभेतून ४५ खासदारांचे निलंबन
मंगळवार १९ डिसेंबर २०२३ : लोकसभेतून ४९ खासदारांचे निलंबन
शुक्रवार ते मंगळवार या काळात संसदेतून १४१ खासदारांचे निलंबन
राज्यसभेच्या ४६ आणि लोकसभेच्या ९५ खासदारांचे निलंबन
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.