राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा

राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा

मुंबई, १२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरुन राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. या अशा वातावरणात राज्य मागसवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनी पदाचा राजीनामा दिला. आयोगाच्या कामात सरकारमधील दोन मंत्री हस्तक्षेप करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मागील काही दिवसांत राज्य मागासवर्ग आयोगातील बबनराव तायवाडे, संजय सोनावणे, लक्ष्मण हाके, बी एल किल्लारीकर या सदस्यांनी सरकारी हस्तक्षेपाचे कारण देत राजीनामे दिले होते. आता आयोगाच्या अध्यक्षांनीही राजीनामा दिला. यामुळे राज्य मागासवर्ग आयोग बरखास्त होण्याची शक्यता आहे. या निमित्ताने राज्य मागासवर्ग आयोगाच्या कामाता हस्तक्षेप करणारे दोन मंत्री कोण अशी चर्चा सुरू झाली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version