‘पीएमपी’ला अंधारात ठेवून ‘बीआरटी’चा काटा

‘पीएमपी’ला अंधारात ठेवून ‘बीआरटी’चा काटा

पुणे, ०८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: पुणे नगर रस्त्यावरील गुंजन टॉकीज ते रामवाडी दरम्यानची ‘बीआरटी’ मार्गिका बुधवारी मध्यरात्री हटविण्यात येणार असल्याची पुसटशी कल्पनाही पुणे महापालिकेने ‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’ला (पीएमपी) दिली नसल्याचे समोर आले आहे. ‘बीआरटी’ उपयुक्त असल्याने सुरुवातीपासून ती हटविण्यास ‘पीएमपी’चा विरोध होता. ‘बीआरटी’ मार्गामुळे बसचा वेग वाढल्याने प्रवासासाठी कमी वेळ लागत असल्याचे निरीक्षण ‘पीएमपी’ने नोंदविले होते. त्यामुळेच पालिकेने ‘गनिमी काव्या’द्वारे रात्रीच्या अंधारात ‘बीआरटी’ मार्गिका हटवली.

स्थानिकांची मागणी

पुणे-नगर रस्त्यावरील येरवडा ते ‘आपले घर’ (खराडी) दरम्यान सात किलोमीटरची ‘बीआरटी’ मार्गिका आहे. नगर रस्त्यावरील मेट्रोच्या कामामुळे विमाननगर चौकापर्यंतचा ‘बीआरटी’ मार्ग सध्या बंद आहे. ‘बीआरटी’मध्ये होणारे अपघात, नगर रस्त्यावरील कोंडी कमी करण्यासाठी मार्गिका काढण्याची मागणी नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी केली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version