ओबीसी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर फलकबाजी

ओबीसी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर फलकबाजी

पुणे, ०८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: शनिवारी पुणे जिल्ह्यातील इंदापुरात ओबीसी एल्गार मेळावा होणार असून या सभेला ओबीसीचे नेते अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे मार्गदर्शन करणार आहेत. या सभेची तयारी पूर्ण झाली असून इंदापूर तालुक्यात भावी मुख्यमंत्री छगन भुजबळ असे बॅनर ठिकठिकाणी झळकु लागले आहेत. ओबीसी समाजातील अनेक नेते या एल्गार सभेमध्ये मार्गदर्शन करणारा असून या सभेकडे पश्चिम महाराष्ट्रातील पहिली सभा म्हणून संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. यातच आता भावी मुख्यमंत्री म्हणून छगन भुजबळ यांचे बॅनर लागल्याने सर्वत्र चर्चा रंगली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version