कोरेगाव भीमाच्या निधीसाठी आमरण उपोषण

कोरेगाव भीमाच्या निधीसाठी आमरण उपोषण

पुणे, ०५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: भीमा कोरेगाव विजयस्तंभ विकासासाठी तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी १०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली. पण पाच वर्ष झाले तरीदेखील अजून हा निधी मिळाला नाही. तो निधी लवकरात लवकर द्यावा तसेच कोरेगाव भीमा दंगलीनंतर झालेल्या आंदोलनात आणि भारत बंद मध्ये आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे घोषित करुनही अजून गुन्हे मागे घेतले नाही, तर या दोन्ही मागण्यासाठी मंगळवारी पुण्यात कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीने तीव्र आंदोलन केले गेले. तसेच मागण्या मान्य होईपर्यत आमरण उपोषण करण्याचा आंदोलनकर्त्यांनी इशारा देण्यात आला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version