राजाराम राऊतांच्या दोन्ही मुलांवर काय म्हणाले नितेश राणे ?

राजाराम राऊतांच्या दोन्ही मुलांवर काय म्हणाले नितेश राणे ?

मुंबई, ३० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : ‘संजय राजाराम राऊतने हे नामर्दांचं सरकार आहे, अशी आमच्या सरकारवर टीका केली. पण मर्दानगीची प्रमाणपत्रं कोण देतंय ? जो डॉक्टर स्वप्ना पाटकर यांच्या घरावर वारंवार हल्ले करतोय, दगड, दारुच्या बाटल्या मारतोय आणि नामर्दासारखं त्यांना पाठवलेल्या धमकीच्या पत्रावर स्वतःचं नाव पण लिहित नाही, तो दुसऱ्यांना नामर्द बोलतोय’, अशा शब्दांत भाजप आमदार नितेश राणे यांनी राऊतांना त्यांच्याच भाषेत चपराक लगावली.

संजय राऊत यांना माजी महापौर दत्ता दळवी यांच्याविषयी ममत्व वाटत आहे. काही दिवसांपूर्वीच दत्ता दळवी यांनीच मला सांगितलं होतं की राजाराम राऊत यांच्या मुलांमुळे ईशान्य मुंबईमध्ये पक्ष संपत चालला आहे. दत्ता दळवी जेव्हा त्यांच्या पक्षात होते तेव्हा त्यांची गाडी फोडण्यात आली. गाडी फोडणारे पळून गेले. मला संशय आहे की राऊत बंधूंशीच संबंधित असावेत, असे नितेश राणे म्हणाले. संजय राऊतच उद्धव गटाचे नुकसान करत आहेत. पण १ जानेवारी २०२४ च्या आधी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे हे दोघेही त्यांच्या बेकायदा कृत्यांसाठी तुरुंगात असतील, असे भाकीत नितेश राणेंनी वर्तविले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version