‘अजित पवार यांचा वापर फक्त लोकसभेपर्यंत’

‘अजित पवार यांचा वापर फक्त लोकसभेपर्यंत’

मुंबई, २९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: अजित पवार यांचा वापर फक्त लोकसभे पर्यंत करण्यात येणार आणि त्यानंतर त्यांना साईड लाईन करण्यात येईल मात्र आतापासूनच त्यांना साईड लाईन करण्यात येत आहे, अशी भविष्यवाणी सुप्रिया गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केलीय ते अकोल्यात बोलत होते. खासदार शरद पवार यांच्या नागपूर येथील सभेकरिता आढावा घेण्यासाठी तर कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सुप्रिया गटाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख अकोला आले असतांना माध्यमांशी ते बोलत होते.

तर आरक्षणाच्या मुद्यावरून राज्य सरकार जाती-जातीमध्ये भांडण लावण्याचं काम करत असल्याचा घणाघात अनिल देशमुखांनी केलाय. अंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटील यांच्या आंदोलन दरम्यान अमानुष लाठीचार्ज करण्यात आला होता,असा अमानुष लाठी हल्ला गृहामंत्र्यांच्या आदेशाशिवाय कोणताही पोलीस अधीक्षक करू शकत नसल्याचा आरोपही माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केलाय.

महाराष्ट्रात अनेक प्रश्न असतांना मुख्यमंत्री भाजपच्या प्रचारासाठी तेलंगणात जात आहेत, याची तीव्र नाराजी जनतेमध्ये असल्याचंही ते म्हणाले..तर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे, बेरोजगारीकडे, महागाईकडे लक्ष द्यावं, अशी विनंतीही अनिल देशमुखांनी केलीय. तर आपल्या मतदार संघातून स्वतः उभे राहणार की सुपुत्र याच खुलासा वेळ आल्यावर करू असे ही ते म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version