कोल्हापूर, २७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : शरद पवार यांचे स्नेही उद्योजक कांतीलाल चोरडिया यांच्यावर कोल्हापूरमध्ये गुन्हा दाखल झाला. शाहूपुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. कांतीलाल चोरडियांवर साठ कोटी रुपयांची वीस हजार चौरसफूट जमीन बनावट कुलमुखत्यारपत्र करून हडपल्याची तक्रार जितेंद्र जाधव यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर कांतीलाल चोरडिया यांचे सख्खे बंधू ईश्वरलाल चोरडिया यांच्या बंगल्यावर शरद पवार आणि अजित पवार यांची एकदा भेट झाली होती.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.