नवी मुंबई मेट्रोच्या सेंट्रल पार्क स्थानकाला मिळाले नाव

नवी मुंबई मेट्रोच्या सेंट्रल पार्क स्थानकाला मिळाले नाव

नवी मुंबई, २६ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: आठवडाभरापूर्वी सुरू झालेल्या नवी मुंबईच्या मेट्रोच्या ‘सेंट्रल पार्क’ स्थानकाच्या नावाचा नामविस्तार करण्यात आला आहे. या स्थानकाचे ‘सेंट्रल पार्क मुर्बीपाडा’ असे नामकरण करण्याचा सिडको प्रशासनाने निर्णय घेतला आहे. या स्थानकाचे नाव बदलण्यासाठी स्थानिकांनी आंदोलन केले होते. मेट्रो सुरू झाली, त्याच दिवशी फलकाचे स्टिकर लावून ही मागणी करण्यात आली होती.

शहरांचा पसारा वाढत चालल्यामुळे भौगोलिकदृष्या गावे लहान वाटू लागली आहेत. सिडकोने विकसित केलेल्या शहरांना गावांची नावे दिली, परंतु लहान गावांचे अस्तित्व हरवत चालले आहे. त्यामुळे गावांचे अस्तित्व टिकवून ठेवून गावाची अस्मिता जपण्यासाठी स्थानिकांकडून धडपड केली जाते. पनवेलमधील नवी मुंबई मेट्रोच्या खारघरमधील ‘सेंट्रल पार्क’ स्थानकाचे नाव बदलण्याची मागणी स्थानकांवर फलक लावल्यापासून सुरू होती. मुर्बी गावातील तरुणांनी एकत्र येऊन यासाठी आंदोलन केले होते. मेट्रो सुरू झाल्यानंतर अखेर आठवडाभरातच सिडकोने नामविस्तार करण्याचा निर्णय घेतला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version