उड्डाणपुलासाठी १४ गर्डर टाकण्याचे काम

उड्डाणपुलासाठी १४ गर्डर टाकण्याचे काम

कल्याण, २६ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: स्मार्ट सिटी प्रकल्पातून कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू असून या पुलावर पहिल्या टप्प्यातील १४ गर्डर टाकले जाणार आहेत. या कामासाठी २५ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरदरम्यान रात्री एक ते पहाटे पाच वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

ज्या भागातील पिलरवर गर्डर टाकले जाणार आहेत त्या भागात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करत ती इतरत्र वळविण्यात आल्याचे वाहतूक विभागाचे सहाय्यक आयुक्त मंदार धर्माधिकारी यांनी सांगितले. स्मार्ट सिटीतील उड्डाणपुलाच्या पिलरच्या कामासाठी मागील जवळपास वर्षभर स्टेशन परिसरातील वाहतूक वळवण्यात आली असून स्टेशन परिसरात केवळ रिक्षांना प्रवेश दिला जात आहे. आता पिलर उभारणीचे काम पूर्ण झाले असून या पिलरवर गर्डर टाकले जाणार आहेत.

२५ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत रात्री १ ते पहाटे ५ पर्यंत हे काम केले जाणार असल्याने या काळात रेल्वे स्टेशन परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. या बदलानुसार वल्ली पीर चौकाकडून कल्याण रेल्वे स्टेशनकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना वल्ली पीर चौकात प्रवेश बंद करण्यात आल्याने ही वाहने गुरुदेव हॉटेल कल्याण रेल्वे स्टेशन मार्गे इच्छित स्थळी जातील.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version