दोन कर्णधार पोहचले ऐतिहासिक अडालज विहिरीवर, फोटोचा इतिहासच सांगतो…

दोन कर्णधार पोहचले ऐतिहासिक अडालज विहिरीवर, फोटोचा इतिहासच सांगतो…

अहमदाबाद, १८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स यांनी आज अहदमाबादमधील प्रसिद्ध अडालज विहिरीला भेट दिली. यावेळी या दोघांनी ट्रॉफीसोबत फोटोशूट देखील केले. हे फोटोशूट वर्ल्डकप २०२३ च्या फायनलच्या पूर्वसंध्येला झाले.

वर्ल्डकप ट्रॉफीसोबतच्या फोटोशूटवेळी रोहित शर्मा ट्रॉफीच्या डाव्या बाजूला उभा आहे तर कमिन्स हा उजव्या बाजूला उभा आहे. इतिहास पाहिला तर फायनलमध्ये पोहचलेल्या संघाचा जो कर्णधार ट्रॉफीच्या डाव्या बाजूला उभा असतो तो सहसा ट्रॉफी जिंकतो. महेंद्रसिंह धोनी, मायकल क्लार्क, इऑन मॉर्गन हे फोटोशूटवेळी डाव्या बाजूला उभे होते. त्या सर्वांनी वर्ल्डकपवर आपला कब्जा केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version