मुंबई, १३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : वेगवेगळ्या कारणांमुळे ऐन दिवाळीत ठिकठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. पुण्यात लक्ष्मीपूजनानंतर आग लागण्याच्या २३ घटना घडल्या. फटाक्यामुळे ठिकठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. अग्निशमन दलाच्या जवानांची प्रचंड धावपळ झाली. या दुर्घटनांमध्ये जीवितहानी झाली नाही पण वित्तहानी झाली. नाशिकमध्ये एका कपड्याच्या दुकानाला आग लागली. या दुर्घटनेत मोठी वित्तहानी झाली. अग्निशमन दलाच्या दहा बंबगाड्यांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले.
मुंबईत प्रदूषण
मुंबई महापालिकेने प्रदूषण नियंत्रण राखण्यासाठी रात्री आठ ते दहा या दोन तासांच्या काळात फटाके फोडण्याचे बंधन घातले होते. प्रत्यक्षात मुंबईत अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत फटाके फोडण्यात आले. यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात वायू आणि ध्वनी प्रदूषण झाले. रात्रीच्या वेळी मुंबईत अनेक ठिकाणी वाऱ्याचा वेग मंदावला होता. यामुळे फटाके फोडण्यात आल्यावर ठिकठिकाणच्या प्रदुषणात वाढ दिसून आली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.