उत्तरकाशी, १३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : उत्तराखंडमधील उत्तरकाशीत बोगद्याचे काम सुरू असताना दुर्घटना घडली. बोगद्याचा एक भाग कोसळला. पडझड झालेल्या बोगद्यात ४० कामगार अडकले आहेत. मदतकार्य करत असलेले अडकलेल्या कामगारांपासून ३५ मीटर अंतरावर आहेत. पडझडीमुळे मोठा ढिगारा निर्माण झाला आहे. यामुळे मदतकार्याचा वेग मंदावला आहे. अडकलेल्या कामगारांना पाईपद्वारे ऑक्सिजन आणि पाणी मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. अडकलेले सर्व कामगार जीवंत आहेत. बोगद्यात अडकलेल्यांच्या सुटकेसाठी तज्ज्ञांच्या मदतीने प्रयत्न सुरू आहेत.
सिल्क्यरा ते दंडलगाव मार्गावरील बोगदा
नवयुग कंपनी करत आहे बोगद्याचे काम
काम सुरू असताना बोगद्याची पडझड
बोगद्यात अडकले ४० कामगार
तज्ज्ञांच्या मदतीने मदतकार्य सुरू
पाईपव्दारे अडकलेल्या ऑक्सिजन, पाण्याचा पुरवठा
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.