फडणवीस मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर

फडणवीस मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर

मुंबई, १० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारपासून दोन दिवसांच्या मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचा प्रचार करण्याकरिता देवेंद्र फडणवीस मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. फडणवीस मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या स्टार प्रचारकांपैकी एक आहेत. यामुळे ठराविक दिवसांच्या अंतराने फडणवीस वारंवार मध्य प्रदेशचा दौरा करत आहेत. मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवार १७ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी रविवार ३ डिसेंबर २०२३ रोजी होणार आहे. मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या २३० जागा आहे. या सर्व जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मध्य प्रदेशच्या विधानसभेचा कार्यकाळ ६ जानेवारी २०२४ रोजी संपणार आहे. याआधी नवी विधानसभा अस्तित्वात यावी यादृष्टीने निवडणुकीच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version