मनसेच्या दीपोत्सवाला सलीम – जावेद

मनसेच्या दीपोत्सवाला सलीम – जावेद

मुंबई, ८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मनसेच्या दीपोत्सवाचा शुभारंभ गुरुवारी सलीम – जावेद यांच्या हस्ते केला जाणार आहे. या संदर्भातले ट्वीट मनसेच्या अधिकृत हँडलवरून करण्यात आले आहे. या ट्वीटवरून उलटसुलट प्रतिक्रियांना उधाण आले आहे. अनेकांनी मनसेवर टीका केली आहे. मराठीचा गजर करणाऱ्या मनसेने दीपोत्सवाचा शुभारंभ करण्यासाठी सलीम – जावेद यांना बोलावले आहे. याविषयी नाराजी व्यक्त होत आहे. राजकारण करण्यासाठी मराठी अस्मिता आणि दीपोत्सवासाठी सलीम – जावेद हे योग्य आहे का, अशा स्वरुपाचा प्रश्न सोशल मीडियातून विचारला जात आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

नेहमीच मराठी भाषिकांसाठी काम करणारा असा कोणता पक्ष ? असा प्रश्न जर विचारला तर अनेकांच्या तोंडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे नाव येते….दुकानांवर मराठी पाट्याच हव्या यासाठी राज्यभर त्यांनी आंदोलन छेडले होते…आताही मराठी भाषिकांच्या हाकेला ते धावून जातात…जेव्हापासून त्यांनी त्यांच्या पक्षाचा झेंडा बदलला….मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले….तेव्हापासून त्यांचे राजकारण हिंदुत्वाच्या दिशेने सुरू झाले…

मनसेकडून हिंदू सणांच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात…आता दिवाळीनिमित्तानेही मनसेने दरवर्षीप्रमाणे दीपोत्सवाचे आयोजन केले…आणि मनसेचा या वर्षीचा दीपोत्सव वादात सापडलाय….

मनसेच्यावतीने दरवर्षी दिवाळीत वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. शिवाजी पार्कवर होणाऱ्या दीपोत्सवाची मनसैनिक आतुरतेने वाट पाहत असतात. मनसेच्या दीपोत्सवाचं यंदा अकरावे वर्ष आहे. सलीम-जावेद यांच्या शुभहस्ते ‘दीपोत्सव २०२३’चं उद्धाटन होणार आहे. यासाठी राज ठाकरे यांनी ट्वीट करत या कार्यक्रमाची माहिती दिली…. यानंतर वादाला तोंड फुटले आहे. नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली…

कोण आहेत सलीम – जावेद ?

सलीम खान आणि जावेद अख्तर पटकथाकार

बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपटांसाठी पटकथालेखन

सत्तरच्या दशकात अनेक चित्रपट या जोडीने गाजवले

अभिनेता सलमान खानचे वडील आहेत सलीम खान

अभिनेत्री शबाना आझमीचे पती आहेत जावेद अख्तर

सलीम – जावेद यांनी कोणकोणत्या चित्रपटांची पटकथा लिहिली आहे पाहुयात…

डॉन
सीता-गीता
मजबूर
क्रान्ती
त्रिशूल
शोले
मिस्टर इंडिया
शक्ति
जंजीर
शान
काला पत्थर
हाथी मेरे साथी
यादों की बारात
दीवार

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version