फडणवीसांच्या शासकीय पूजेस मराठ्यांचा विरोध

फडणवीसांच्या शासकीय पूजेस मराठ्यांचा विरोध

पंढरपूर, ०८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: कार्तिकी एकादशीला पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या शासकीय महापुजेचा मान कोणाला द्यायचा यावर पेच निर्माण झाला होता. आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पुजा केली जाते. दरम्यान, राज्यात आता दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे अजित पवार की देवेंद्र फडणवीस, कोणाच्या हस्ते शासकीय महापुजा होणार असा प्रश्न होता. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकल मराठा समाजाने आक्रमक होत मंदिर समितीच्या बैठकीवेळी जोरदार घोषणाबाजी केली होती. तसंच उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी पुजा रोखण्याचा इशाराही दिला होता. आता विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने याबाबत निर्णय घेतला असून कार्तिकी एकादशीला कोणत्याच उपमुख्यमंत्र्यांना बोलावणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version