छत्रपती संभाजीनगर, ८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका खाजगी रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांचे आंतरवाली सराटीत उपोषण सुरू असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज ठाकरे, संभाजीराजे छत्रपती यांच्यासह अनेक मंत्र्यांनी भेट दिली होती. परंतु, दोन्ही उपोषणावेळी फडणवीस एकदाही त्यांना भेटण्यासाठी गेले नाहीत. तर काही वेळा बोलताना मनोज जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर थेट टीकाही केली होती.मनोज जरांगे यांच्या टीकेला भाजप नेत्यांनी प्रतिउत्तर दिले होते.
दरम्यान, आता छत्रपती संभाजीनगर शहरात जरांगे यांच्यावर उपचार सुरू आहे, याचवेळी आज फडणवीस छत्रपती संभाजीनगरमध्ये आज फडणवीस येणार आहे. त्यामुळे आज ते जरांगे यांची भेट घेणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
देवेंद्र फडणवीस बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाला जाणार
छत्रपती संभाजीनगरमधील आयोध्या नगरी मैदानावर बागेश्वर धाम यांचे तीन दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आज बागेश्वर बाबांच्या दरबाराचा समारोप होणार आहे. या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस जाणार आहेत. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते आरती केली जाणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.