बीआरएसने तेलंगणाला फसवले

बीआरएसने तेलंगणाला फसवले

हैदराबाद, ७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : बीआरएस अर्थात भारत राष्ट्र समितीने तेलंगणाला फसवले असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. ते हैदराबाद येथे जाहीर सभेत बोलत होते. राज्याची निर्मिती भ्रष्टाचार, घराणेशाही, रोहिंग्या दहशतवाद, मद्य आणि अंमली पदार्थ यांची तस्करी यासाठी केलेली नाही. पण तेलंगणाच्या स्थापनेपासून या अशा स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. या सर्वाला राज्याचे नेतृत्व करणारी भारत राष्ट्र समिती कारणीभूत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

भाजपाच ओबीसींना न्याय देईल

भाजपाच ओबीसींना न्याय देईल. भारतात ओबीसी व्यक्तीला पंतप्रधान करण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. संधी मिळाल्यास तेलंगणामुध्ये ओबीसी मुख्यमंत्री देण्याची तयारी भाजपाची आहे, असे सूतोवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version