नवी दिल्ली, ६ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : दिल्लीत प्रदूषण नियंत्रणात ठेवण्याकरिता वाहनांसाठी ‘सम – विषम’ नियम लागू करण्याचा निर्णय झाला आहे. दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी ही माहिती दिली. दिल्लीत सोमवार १३ नोव्हेंबर पासून त्या पुढील सोमवार २० नोव्हेंबर पर्यंत सलग आठ दिवस वाहनांसाठी ‘सम – विषम’ नियम लागू असेल, असे गोपाल राय म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.