नेरळ – माथेरान मिनी ट्रेन सुरू

नेरळ – माथेरान मिनी ट्रेन सुरू

रायगड, ०४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: पर्यटकांची दिवाळी गोड करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. माथेरानच्या मिनीट्रेनची सेवा ही पुन्हा नेरळ ते माथेरान अशी सुरु करण्यात आली आहे. ४ नोव्हेंबर म्हणजेच शनिवार पासून नेरळ – माथेरान – नेरळ ही मिनीट्रेनची सेवा पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. यासाठी रेल्वेप्रशासनाकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. सध्या अमन लॉज ते माथेरान अशी सेवा सुरु आहे. पावसाळ्यात नेरळ ते अमन लॉज ही सेवा बंद करण्यात आली होती. पण ही सेवा आता पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version