मुंबई, ०३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : व्ही पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ५६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. अतुल बेडेकर हे लोणची, मसाले आणि चटणी या पारंपारिक व्यवसायातील प्रतिष्ठित नाव होते. ते गेले काही दिवस कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी झुंजत होते. त्यांचे उपचारादरम्यान एका खासगी रुग्णालयात रात्री १२.३० च्या सुमारास निधन झाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.