जेव्हीएलआर जंक्शनवर प्रदूषण नियंत्रण मशीन

जेव्हीएलआर जंक्शनवर प्रदूषण नियंत्रण मशीन

मुंबई, २ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. श्वसन विकाराने त्रस्त नागरिकांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांनी पालिका प्रशासनाला जोगेश्वरीतील जेव्हीएलआर जंक्शनवर प्रदूषण नियंत्रण मशीन लावण्याचे निर्देश दिले आहेत.

वातावरणातील बदलांमुळे मुंबई महानगरासह मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे. याचा परिणाम म्हणून हवेतील प्रदूषणात वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. जोगेश्वरी पूर्व येथे नवीन विकास कामे, मेट्रो उड्डाणपुलाचे काम जोरात सुरू आहेत. त्यामुळे जेव्हीएलआर जंक्शनच्या परिसरात प्रदूषण खूप वाढले आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांना ऑगस्ट महिन्यामध्ये पत्र लिहून माजी नगरसेवक पंकज यादव यांनी वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली होती. तसेच जेव्हीएलआर जंक्शनवर प्रदूषण नियंत्रण मशीन बसवण्याची मागणी केली होती. त्यानुसार पालकमंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईत बसवण्यात येणाऱ्या पाच प्रदूषण नियंत्रण मशिनपैकी एक जेव्हीएलआर जंक्शनवर बसविण्याचे निर्देश दिले आहेत. नोव्हेंबरच्या अखेरीस हे काम पूर्ण होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version