मुंबई, १ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर शुक्रवार ३ नोव्हेंबर रोजी महत्त्वाची बैठक आहे. या बैठकीला सत्ताधारी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व खासदार आणि आमदार उपस्थित असतील. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार मार्गदर्शन करणार आहे. अजित पवार आजारी आहेत. त्यांची तब्येत बरी असेल तर ते बैठकीला उपस्थित राहतील, असे सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात आले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.