राणे, चव्हाण आणि फडणवीसांमध्ये बैठक

राणे, चव्हाण आणि फडणवीसांमध्ये बैठक

मुंबई, २५ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : निलेश राणे यांनी ट्वीट करून राजकीय संन्यास घेत असल्याची घोषणा केली. यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी भाजपात अंतर्गत पातलीवर खलबतं झाली. मंत्री रविंद्र चव्हाण यांनी स्वतःसोबत निलेश राणे यांना कारमधून देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी नेले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी रविंद्र चव्हाण, निलेश राणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली. चर्चेअंती रविंद्र चव्हाण आणि निलेश राणे पत्रकारांशी बोलले. यावेळी निलेश राणेंची नाराजी दूर करण्यासाठी लवकरच योग्य ती कृती केली जाईल, असे संकेत रविंद्र चव्हाण यांनी दिले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version