मुंबई, २५ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : दसऱ्यानिमित्त मुंबईत शिवाजी पार्क येथे उद्धव गटाने सभा घेतली. या सभेत बोलताना पुन्हा एकदा उद्धव यांनी तेच ते जुने रडगाणे नव्याने गाऊन दाखवले. ‘तेच रडगाणं तेच बडबडणं तेच तराने’ या शब्दात उद्धव यांच्या भाषणाचे वर्णन करता येईल, असे भाजपाचे केशव उपाध्ये म्हणाले.
बाळासाहेबांनी आणि शिवसैनिकांनी शिवसेना वाढवली. उद्धव यांनी तर कॉलेजची निवडणूक पण लढवल्याचे आठवते का तुम्हाला ? असा प्रश्न केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला. सत्ता हाती आली तेव्हा उद्धव मुख्यमंत्री झाले आणि आदित्य कॅबिनेट मंत्री झाले. सामान्य शिवसैनिकांना काय मिळाले, असा प्रश्न केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला. उद्धव यांनी पक्षात किती वेळा निवडणुका घेतल्या, अंतर्गत लोकशाही जपली ? असाही प्रश्न केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.