मराठ्यांना टिकणारे आरक्षण देणार

मराठ्यांना टिकणारे आरक्षण देणार

मुंबई, २४ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : दसऱ्याच्या निमित्ताने मंगळवारी राजकीय धुरळा उडला. मुंबईत आझाद मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा झाला. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी बोलताना आझाद मैदानावर आझाद शिवसेनेचा आझाद मेळावा सुरू आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच मराठ्यांना टिकणारे आरक्षण देणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

मराठा आरक्षण

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देणार, मराठ्यांना न्याय देणार; अशी शपथ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नमस्कार करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. कोणीही टोकाचे पाऊल उचलू नका, आत्महत्या करू नका; असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील महत्त्वाचे वक्तव्य

‘मराठ्यांना टिकणारे आरक्षण देणार’
‘टोकाचे पाऊल उचलू नका, आत्महत्या करू नका’
मुख्यमंत्री शिंदे यांचे वक्तव्य

‘जिथे बाळासाहेबांचे विचार तेच शिवतीर्थ’
मुख्यमंत्री शिंदे यांचे वक्तव्य

‘मोदींचे हात बळकट करणे गरजेचे’
मुख्यमंत्री शिंदे यांचे वक्तव्य

‘सामान्यातला एक मुख्यमंत्री व्हावा..’
‘.. सरंजामी लोकांना हे आवडत नाही’
मुख्यमंत्री शिंदेंचे वक्तव्य

‘मी तुम्हाला मुख्यमंत्री झालेलो बघवत नाही’
मुख्यमंत्री शिंदे यांचे वक्तव्य

‘उद्धव गट काँग्रेसचे जोडे उचलत आहे’, मुख्यमंत्री शिंदेंनी केला हल्लाबोल
‘उद्धव स्वार्थासाठी हमासची गळाभेटही घेतील’, मुख्यमंत्री शिंदेंनी केला हल्लाबोल
‘उद्धवना २००४ पासूनच मुख्यमंत्री पदाचा हव्यास’, मुख्यमंत्री शिंदेंनी केला हल्लाबोल
‘उद्धव साधू नाही, संधीसाधू’, मुख्यमंत्री शिंदेंनी केला हल्लाबोल

‘उद्धव गटाने आमच्याकडेच पन्नास खोके मागितले’
‘उद्धव गटाला खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो’
एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट

‘पावसात बाळासाहेबांना उद्धवनी वाऱ्यावर सोडलं’
एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट

‘शिवाजी पार्कवर हुजऱ्यांची सभा’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version