‘त्रास देणाऱ्यांचं घर उन्हात बांधू’

‘त्रास देणाऱ्यांचं घर उन्हात बांधू’

गोपीनाथ गड, , २४ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : मी ग्रामपंचायतची नसताना शिवशक्ती परिक्रमा यात्रेत लोकांनी माझ्यावर जेसीबीने फुलांची उधळण केली. माझ्या कारखान्यावर रेड झाली तेव्हा लोकांनी दोन दिवसांत अकरा कोटी जमा केले. तुम्ही आज उन्हात बसलात म्हणून स्टेजवरच्या लोकांना देखील मी उन्हात ठेवलंय. कारण माझी माणसं उन्हात असतील तर सत्तेच्या खुर्चीवर सावलीत बसणाऱ्यांचं रक्त गोपीनाथ मुंडेंचं असूच शकत नाही. एकवेळ मला देऊ नका, पण माझ्या माणसाला सत्तेपासून तुम्ही दूर ठेऊ शकत नाही, असा इशाराच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना दिला.

विजयादशमीदिनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरून समर्थकांशी संवाद साधला. प्रीतम मुंडे यांच्या भाषणानंतर पंकजा मुंडे यांचे भाषण सुरू झाले. यावेळी मी ताईच्या नाही तर आता तुमच्या आईच्या भूमिकेत आली आहे, अशी भावनिक साद घालत पंकजा मुंडे यांनी भाषणाला सुरुवात केली.

माझ्या आयुष्यातली एखादी निवडणूक मी हरली असेन पण तुमच्या नजरेत मी कधी पडले नाही. इथे धनगर, माळी, मराठा, मुस्लीम अशा सगळ्या समाजाचे लोक आले आहेत. या सर्वांना रकारकडून खूप अपेक्षा आहेत, आता अपेक्षाभंग सहन करू शकत नाही; असे पंकजा मुंडे म्हणाल्या. दरवेळी तुम्ही आशा लावता, तुमचा अपेक्षाभंग होतो, यासाठी मी तुमची माफी मागते. पण आता माझी माणसं संयम दाखवणार नाही. आपल्याला त्रास देणाऱ्यांचं घर आपण उन्हात बांधू, शिवशंकर भोळा आहे पण त्याला तिसरा डोळा आहे, असा इशारा पंकजा मुंडे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना दिला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version