बिशनसिंग बेदींचे निधन

बिशनसिंग बेदींचे निधन

नवी दिल्ली, २३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : क्रिकेट विश्वचषक सुरू असताना एक दुःखद बातमी आली आहे. भारताचे माजी कर्णधार आणि फिरकीपटू बिशनसिंग बेदी यांचे निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांनी बारा वर्ष भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले.

बिशनसिंग बेदी यांनी ५ जानेवारी १९६७ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द सुरू केली. ते शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ४ सप्टेंबर १९७९ रोजी खेळले.

बिशनसिंह बेदी
जन्म : २५ सप्टेंबर १९४६, अमृतसर
दिल्लीकडून देशांतर्गत क्रिकेट
नॉरदॅम्पटनशायरकडून काउंटी क्रिकेट
१९६६ : कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण विरुद्ध वेस्ट इंडिज
१९७९ : शेवटचा कसोटी सामना, विरुद्ध इंग्लंड
६७ कसोटी
२६६ बळी
डावातील सर्वोत्तम कामगिरी : ९८ धावा देत ७ बळी
कसोटीतील सर्वोत्तम कामगिरी : १९४ धावा देत १० बळी
कसोटी क्रिकेटमध्ये १४ वेळा पाच किंवा जास्त बळी घेतले
कसोटी क्रिकेटमध्ये एकदा दहा बळी घेतले
६७ सामन्यात ६५६ धावा
सर्वोत्तम धावसंख्या : नाबाद ५०

१३ जून १९७४ : एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण विरुद्ध इंग्लंड
१८ जून १९७९ : शेवटचा एकदिवसीय सामना विरुद्ध श्रीलंका
१० एकदिवसीय सामने
७ बळी
सर्वोत्तम कामगिरी : ४४ धावा देत २ बळी
१० एकदिवसीय सामन्यात ३१ धावा

प्रथम श्रेणी क्रिकेट

३७० सामने
१५६० बळी
सर्वोत्तम : ५ धावा देत ७ बळी
१०६ वेळा पाच बळी घेतले
२० वेळा दहा बळी घेतले

७२ लिस्ट ए सामन्यात ७१ बळी
लिस्ट ए क्रिकेट, सर्वोत्तम कामगिरी : ३० धावा देत ५ बळी

प्रथम श्रेणी क्रिकेट : ७ अर्धशतके, ३५८४ धावा
लिस्ट ए : ७२ सामन्यांत २१८ धावा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version