राम मंदिरासाठी विदेशी देणग्या स्वीकारता येणार

राम मंदिरासाठी विदेशी देणग्या स्वीकारता येणार

नवी दिल्ली, १९ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : अयोध्येत राम जन्मभूमी येथे राम मंदिराच्या निर्मितीचे काम सुरू आहे. या मंदिरासाठी विदेशातून देणग्या स्वीकारण्यास श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र या विश्वस्त संस्थेला केंद्रीय गृह मंत्रालयाने परवानगी दिली आहे. ही माहिती या ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली. ट्रस्टचे भारतीय स्टेट बँकेत खाते आहे. या खात्यात थेट देणगी जमा करता येईल.

अयोध्येतील तीन मजली राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी २०२४ रोजी होणार आहे. ही प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. मंदिराची उंची १६१ फूट असेल. मंदिरात भाविकांच्या सोयीसाठी लिफ्टची व्यवस्था असेल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version