‘मुख्यमंत्र्यांची दिशाभूल कुणी केली ?’

‘मुख्यमंत्र्यांची दिशाभूल कुणी केली ?’

मुंबई, १६ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांनी कुणबी प्रमाणपत्र ही मागणी नव्हतीच. पण मनोज जरांगे पाटील यांनी ही मागणी केली. सरसकट मराठा नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे आणि ओबीसीमधून आरक्षण द्यावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. यानंतर मुख्यमंत्री जरांगे पाटील यांना भेटले. मुख्यमंत्र्यांशी बोलताना पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्राची मागणी केली. यानंतरच मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचे निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन केली. आता कुणबी ही मागणी नव्हती तर मुख्यमंत्र्यांची दिशाभूल कुणी केली ? असा प्रश्न मराठा समन्वयक आबासाहेब पाटील यांनी उपस्थित केला.

जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या लक्षवेधी या कार्यक्रमात ‘जरांगे पाटील यांची मागणी चुकलीय’ या विषयावर चर्चा सुरू होती. या चर्चेत जरांगे पाटील यांचे समर्थक किशोर चव्हाण यांनी नवी माहिती दिली. कुणबी प्रमाणपत्राची मागणी जरांगेंची नव्हतीच, ही मागणी आमच्यावर लादण्यात आली; असे मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक किशोर चव्हाण म्हणाले. चव्हाण यांच्या या वक्तव्यावर मराठा समन्वयक आबासाहेब पाटील यांनी थेट प्रश्न उपस्थित केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version